मा. डॉ. बिरजू सहानी यांची "समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५" साठी निवड...
schedule21 May 25 person by visibility 60 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापुरात शाहुस्मारक सभागृहात होणार दिमाखदार सन्मान सोहळा
कोल्हापूर: दिव्या कांबळे
डॉ. बिरजू श्रीराम सहानी यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. समर्थ फाउंडेशन आणि दुर्गा फाउंडेशन- जागर न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार २५ मे २०२५ रोजी शाहुस्मारक सभागृह, कोल्हापूर येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.
डॉ. सहानी हे मागील ९ वर्षांपासून कोल्हापूरमध्ये यशस्वीरीत्या होमिओपॅथीचा सराव करत आहेत. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जयसिंगपूर या नामवंत संस्थेतून पूर्ण केले आहे. ते "गुरुपूजा क्लिनिक" चे संस्थापक आहेत, जे ढेकळे बिल्डिंग, शिंदे कॉलनी, उंचगाव, कोल्हापूर येथे कार्यरत आहे. हजारो रुग्णांनी या ठिकाणी त्वचेचे विकार, मूळव्याध, मानसिक आजार, संधिवात, दमा, मूत्रपिंडातील दगड, मधुमेह अशा विविध आजारांपासून मुक्तीचा अनुभव घेतला आहे.
त्यांची उपचारपद्धती ही रुग्णाच्या संपूर्ण इतिहासावर आधारित वैयक्तिक निदान यावर आधारित असून, साइड इफेक्टशिवाय मुळापासून आजार नष्ट करण्यावर भर दिला जातो. डॉ. बिरजू सहानी यांचा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण व प्रेरणादायी आहे. मूळ उत्तर प्रदेश येथील असलेले सहानी कुटुंब मागील ४५ वर्षांपासून कोल्हापुरात स्थायिक आहे. त्यांच्या आई-वडिलांनी शिक्षण घेतले नसूनही अत्यंत कष्ट करून मुलांना शिकवले.
मोठे भाऊ चंदन सहानी, बहीण संगीता सहानी व त्यांचे मिस्टर रामप्रसाद सहानी, तसेच वहिनी सीता सहानी यांनी शिक्षणात आणि जीवनप्रवासात मोठी मदत केली. क्रिकेट व बाईक राईडिंग हा त्यांचा छंद आहे. तसेच निसर्ग, वाइल्ड लाईफ, आणि सामाजिक विषयांची माहिती घेण्याची त्यांना विशेष आवड आहे. डॉ. सहानी हे संत निरंकारी मिशनचे सक्रिय सेवादल सदस्य आहेत. त्यांना त्यांच्या अध्यात्मिक जीवनात निरंकारी माताजींच्या कृपेचा मोठा विश्वास आहे. त्यांनी समाजकार्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
"हेल्पिंग हँड" या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून ते प्रत्येक दोन महिन्यांनी कोल्हापुरात अन्नवाटप करतात. त्यांच्या टीममध्ये संकेत सोनवणे, प्रदीप कंबरे, प्रशांत दादा, शोभित सहानी हे कार्यकर्तेही सक्रियपणे सहभागी असतात. कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांसाठी गुरुपूजा क्लिनिक हे विश्वासाचं ठिकाण बनलं आहे. येथे आधुनिक निदान आणि पारंपरिक होमिओपॅथीचा उत्तम संगम पाहायला मिळतो.त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने डॉ. सहानी यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशस्वी वैद्यकीय कार्याची, सामाजिक योगदानाची आणि सेवाभावी वृत्तीची दखल घेत त्यांना हा सन्मान दिला जात आहे.