साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
schedule01 Aug 25 person by visibility 14 categoryकोल्हापूर

कोल्हापूर,दि. 1 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लीकर, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले, समाज कल्याण विभागाचे कार्यालय अधीक्षक श्री. पाटील तसेच महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात मातंग समाजातील ज्येष्ठ समाज सेवक राजेंद्र घाडगे यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग व तत्सम जातीच्या विद्यार्थ्यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत धनादेश व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक प्रशांत तेलंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण भोर, अजित साठे, श्रध्दा गव्हाणकर व बीव्हीजी कर्मचारी यांनी सहकार्य केले.