लोकेनेते स्व. राजारामबापू पाटील यांची १०६ व्या जयंती
schedule01 Aug 25 person by visibility 31 categoryPolitics

इस्लामपूर : येथील तहसील कार्यालय समोर आज (ता. १ ऑगस्ट) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती निमित्त कार्यक्रमात माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या थेट वंशज बयाबाई लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर अध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, गोटखिंडी सरपंच विजय लोंढे, सागर चव्हाण, सुधाकर वायदंडे, पाटोळे, संतोष चांदणे, उत्तम चांदणे, सुधाकर वायदंडे, प्रवीण बडेकर, शंकर महापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
साखराळे (ता. वाळवा) : लोकेनेते स्व. राजारामबापू पाटील यांची १०६ व्या जयंतीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना स्थळावर असलेल्या स्व राजारामबापूंच्या पुतळ्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
