विद्यापीठाच्या दारात जयंती व स्मृतिदिन साजरी
schedule01 Aug 25 person by visibility 40 categoryEducationBusinessTechnology

माजी सैनिकांनी आंदोलन स्थळी विद्यापीठाच्या दारात अण्णाभाऊ साठे ,लोकमान्य टिळक व शंकर धोंडी पाटील यांची जयंती व स्मृतिदिन साजरी करुन न्या
याची लढाई जिंकण्याची प्रतिज्ञा घेतली.
---------------------------
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या माजी सैनिकांना गेले पाच वर्षे सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळाला नाही म्हणून, 21 जुलैपासून आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठाकडील गलथान प्रशासनामुळे गेले दहा वर्षे सुरक्षा रक्षक माजी सैनिकांच्या वर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आता पाठिंबा वाढत आहे. आज राधानगरी परिसर माजी सैनिक संघटनेचे शंकर पाटील व त्यांचे सहकार्यानी येऊन कुलगुरूंना पत्र दिले व माजी सैनिकांनाही येऊन पाठिंबा दिला.एक ऑगस्टला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची 105 वी जयंती, लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन, व संघर्ष योद्धे माजी आमदार शंकर धोंडी पाटलांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ,आंदोलक माजी सैनिकांनी, अण्णाभाऊ साठे ,लोकमान्य टिळक, व शंकर धोंडी पाटील यांच्या फोटोला हार अर्पण करून स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, महागाई व धरणग्रस्तांच्या विरोधातील चळवळ यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी प्राध्यापक प्रभू प्रसाद रेळेकर यांनी आंदोलकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ,लोकमान्य टिळक, व शंकर धोंडी पाटील यांच्या चळवळीचा इतिहास व्याख्यानातून सांगितला. प्रास्ताविक रवी जाधव यांनी केले , साथीशिवाजीराव परुळेकर यांनी आभार मानले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या माझीमैनागावावर राहिली ही लावणी माजी सैनिकांनी सादर केली. या सर्व चळवळीच्या इतिहास ऐकल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ही चळवळ, आंदोलन, थांबवायचे नाही अशी प्रतिज्ञा केली. यावेळी माजी सैनिक भगवान सुतार,ए. एन .पाटील ,दत्तात्रय मोहिते, धनवडे ,वासुदेव ,बबन खाडे, खामकर, तराळ, व कोगले इत्यादी पंचवीस वर माजी सैनिकांनी गड्या आता थांबायचे नाय हे सिनेमातील गाणे सादर करून आपली आंदोलनाची भूमिका गाण्यातून स्पष्ट केली.