दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा
schedule01 Aug 25 person by visibility 19 categoryकोल्हापूरEducation

कोल्हापूर दि. 1 : इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मान्यताप्राप्त शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती ही राज्य सरकारची योजना कार्यान्वित आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी युडीआयडी कार्ड, आधारकार्ड, महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला, मागील वर्षाचे गुणपत्रक इत्यादी कागदपत्रे स्कॅन करुन अर्ज ऑनलाईन भरावयाचा आहे. जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. या शिष्यवृत्तीपासून कोणताही दिव्यांग विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व शाळांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांनी केले आहे.