निर्लेखित साहित्य खरेदीसाठी दरपत्रके सादर करावीत
schedule01 Aug 25 person by visibility 26 categoryकोल्हापूरBusinessTechnology

कोल्हापूर दि. 1 : संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून सन 1990 व सन 2017 मध्ये सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालयास व अधिनस्त तालुका कार्यालयास प्राप्त झालेले व 10 वर्षापेक्षा जास्त जुने कालबाह्य झालेले साहित्य विनावापर पडून आहे. या साहित्याचा प्रतिवर्षी 60 टक्के प्रमाणे घसारा वजा करुन विक्रीस येणाऱ्या किंमतीपैकी जास्तीत-जास्त दराच्या दरपत्रकाप्रमाणे साहित्य विक्री करण्यात येणार आहे.
लाकडी खूर्ची (जूने), लोखंडी विणलेल्या खुर्च्या, रिव्हॉलव्हींग खुर्ची (सीट बॅक कोम), प्रिंटर, किबोर्ड, स्टेशनरी साहित्य आदी साहित्यांची विक्री करण्यात येणार आहे. या विनावापर, नादुरुस्त व बंद अवस्थेत असलेल्या साहित्याच्यास विक्रीसाठी विविध ठेकेदारांकडून दरपत्रके मागवून जास्तीत जास्त दराचे दरपत्रक देणाऱ्या ठेकेदारास साहित्य विकत देण्यात येईल. दरपत्रके या कार्यालयास ही जाहिर सुचना प्रसिध्द झाल्यानंतर १० दिवसांच्या आत सादर करावीत. विकत घेतलेली उपकरणे संबंधितांना हस्तांतरीत करीत असताना उपकरणास काही दोष उद्भवल्यास त्याबाबत कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. वाहतुकीबाबतचा खर्च संबंधितांना करावा लागेल. दरपत्रक मंजूर झाल्यानंतर संबंधिताना कळविण्यात येईल. मंजूर झालेल्या दरपत्रकांच्या खरेदी दराने तात्काळ रक्कम सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला उत्तर बाजूस, कसबा बावडा रोड, कोल्हापूर (दूरध्वनी क्रमांक 0231-2652211) वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता ममता पाटील यांनी केले आहे.