तुळजाभवानी गाभारा दर्शन या कालावधीत बंद
schedule01 Aug 25 person by visibility 38 categoryTravel

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे दर्शन आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत हे दर्शन बंद राहील. या काळात भाविकांना मुखदर्शन घेता येईल, परंतु प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंहासन गाभाऱ्यात जीर्णोद्धार होणार आहे. मंदिर संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, "देवीचे धार्मिक विधी तसंच सिंहासन पूजा अभिषेक पूजा नियमित सुरू राहतील." श्रावण महिन्यात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याची नोंद घ्यावी. हे काम भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिराच्या संरक्षणासाठी हाती घेण्यात आले आहे.