लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर व्याख्यान
schedule02 Aug 25 person by visibility 14 categoryकोल्हापूर

माजी राज्यमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर : मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर युवा व्याख्याते प्रा. प्रकाश नाईक यांचे जाहीर व्याख्यान रविवार दि. 3 ऑगस्ट, रोजी दुपारी 12:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून यावेळी माजी राज्यमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रा. किसनराव कुराडे, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके, अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, विश्वासराव तरटे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजीव आवळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण आणि विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्या शंकर पुजारी (कोल्हापूर), संजय मुळे (छत्रपती संभाजी नगर), आनंतराव घोगरे (धाराशिव), राजेंद्र पिंपळे (नंदुरबार), डॉ. धनंजय साठे (सोलापूर), अॅड. मारुती व्हनखंडे (सांगली), लालू गुजलवाड (नांदेड), श्रीपाद पटवर्धन (विजयपूर), रमेश भालेराव (लातूर), नामदेव नागटिळे (कोल्हापूर), प्रमोद साठे (छत्रपती संभाजी नगर), डॉ. वैशाली गुंजेेकर (कोल्हापूर), विधाताभाऊ आहिरे (नाशिक), जितेंद्र चोकाककर (कोल्हापूर), डॉ. दशरथ रसाळ (सोलापूर), डॉ. संदीप वाकडे (पुणे), संजय कांबळे (बीड), जतीन वाघमारे (बीड), सुशांत पाटील (इचलकरंजी), उमेश मेश्राम (भंडारा), रूपचंद फुलझेले (चंद्रपूर), जया बागुल (जालना), भागवत मसने (बीड), विजयकुमार भुजबळ (सातारा), आबासाहेब साबळे (सोलापूर), सुरेंद्र घुडे (रत्नागिरी), सातापा कांबळे (कोल्हापूर), प्रेरणा शेजवळ (इगतपुरी), सौरभ जगताप (इगतपुरी), संदीपभाऊ वानखेडे (वर्धा), प्रा. बाळू गायकवाड (सोलापूर), निशांत आवळेकर (सांगली), अॅड. संतोष शिंदे (पुणे), बळीराम रणदिवे (सांगली), मोहनभाऊ देवतळे (गडचिरोली), सुनंद भामरे (धुळे), प्रल्हाद बट्टेवार (रायगड), चंद्रकांत पांढरे (सांगली), रमेश कांबळे (कोल्हापूर) शैलेश गायकवाड (कोल्हापूर), सुधामती लोखंडे (पुणे), अनिल काजवे (कोल्हापूर), शेखर कांबळे (कोल्हापूर)
यांचाही लोकशाहीर आण्णा भाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, आदित्य म्हमाने अमिरत्न मिणचेकर यांनी केले आहे.