Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
विष्णू शिंदे यांच्या 'दावण' कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार...पत्रकाराच्या प्रश्नावर वैष्णवीच्या सासऱ्याची धक्कादायक प्रतिक्रिया... वैष्णवी हगवणे प्रकरणावर काय म्हणाले प्रवीण तरडेपरिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका... शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी... संजय राऊतांचा धुळे येथील कॅशकांड प्रकरणात कुणावर गंभीर आरोप...  वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया... प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट... आवळीतील धरणाची दुरुस्ती करणेची ग्रामस्थांची मागणी...

जाहिरात

 

शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात संभाजी भिडे यांची मोठी मागणी... 

schedule23 May 25 person by visibility 76 categoryकोल्हापूर

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महत्वाची मागणी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करु नये. त्या दिवशी साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे. तसेच तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा केला पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो. त्याप्रमाणे शिवराज्याभिषक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली. आपण अजून ब्रिटिशांच्या प्रथेप्रमाणे तारखेनुसार उत्सव साजरा करतो. हे उत्सव तिथीप्रमाणे साजरे करावे. तसेच रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

रायगडावर असलेले वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला होता. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही, असे संभाजी राजे यांनी म्हटले होते. त्यांच्या या मागणीला संभाजी भिडे यांनी विरोध केला होता. त्यामुळे हा वाद काही दिवसांपूर्वी चांगला रंगला होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes