Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
बहिणींनो, भाऊरायाच्या रक्षणासाठी बांधा 'या' रंगांची राखीमॅच संपू दे मग बघतो, अंपायर धर्मसेनाने केएल राहुलला दिली धमकी, नेमकं घडलं काय?आशियाई देशांमध्ये सोन्याची मागणी पुन्हा वाढली, एका तोळ्याचा दर किती?सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर व्याख्यानकोल्हापूर मध्ये सर्किट बेंच-न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावानिर्लेखित साहित्य खरेदीसाठी दरपत्रके सादर करावीतसार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कारासाठी सहभागी होण्याचे आवाहनमहसूल विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 35 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान

जाहिरात

 

गडहिंग्लज साखर कारखान्यात तब्बल २९ कोटींचा गैरव्यवहार

schedule13 Dec 24 person by visibility 277 categoryकोल्हापूरPolice Diary

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात तब्बल २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापुरकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.

 बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर प्रकरण: यात ११ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. आधुनिकीकरण, विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमितता या सर्व प्रकरणांमध्ये साखर कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, पोलिसांनी तपास सुरू केला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये कारखान्याचे काही वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित घटकांचा समावेश आहे.

या घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली आहे. साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र या प्रकाराने सहकारी क्षेत्रात पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

गडहिंग्लज पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपींवर कडक कारवाई होण्याची मागणी केली जात आहे. पुढील तपासाद्वारे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes