चिखलीत स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग.....
schedule09 Dec 24 person by visibility 185 categoryBusiness

पिंपरी : चिखली येथील कुदळवाडी परिसरात सकाळी दहा वाजेच्या सुमारास भंगार गोदामासह काही दुकाने आणि लघुऊद्योग स्थळांमध्ये भीषण आग लागली. प्रशासनाच्या अंदाजानुसार, आगीत पन्नास पेक्षा जास्त दुकाने जळाल्याची शक्यता आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट उसळले असून, आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन तासांनंतर देखील आग आटोक्यात आलेली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी कर्तव्यावर होते. आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनास्थळावरून काही नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून, परिसर रिकामा करण्यात आला आहे.
आग लागली असलेली जागा आणि परिसरातील इतर लोकांना कोणतीही जास्त हानी होऊ नये यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाने दक्षता घेतली आहे. अधिक तपास सुरू आहे.