Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न... पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर

जाहिरात

 

हिटमॅन रोहित शर्माची संपत्ती किती..? 

schedule11 Mar 25 person by visibility 73 categorySports

रोहित शर्मा भारती क्रिकेट नियामक मंडळाच्या A+ ग्रेडचा खेळाडू आहे. तो भारतीय संघाचा कर्णधारदेखील आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआयकडून वर्षाला सात कोटी रुपये मानधन मिळते. तसेच एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवशी सामन्यासाठी 6 लाख आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. रोहित शर्मा याला IPL मधून 16 कोटी रुपये मिळतात. क्रिकेटमधून मिळणारे उत्पन्न हे रोहित शर्माच्या कामाईचा मोठा भाग आहे.

संपत्ती 214 कोटी रुपये आहे. फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते. तसेच इतर ब्रॅडच्या जाहिरातीचे उत्पन्न मिळवल्यावर ही कमाई त्यापेक्षा जास्त आहे. रोहित शर्मा गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे. त्याने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक जवळजवळ 90 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याने मुंबईत फ्लॅट घेऊन ते भाड्याने दिले आहे. त्यातूनही त्याला लाखोंचे उत्पन्न मिळते.

रोहित शर्मा क्रिकेटबरोबर इतर कंपन्यांच्या जाहिरातीमधून उत्पन्न मिळवतो. तो अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कंपन्यांचा ब्रँड अंबेसेडर आहे. त्यात विविध  यासारख्या कंपन्या आहेत.


 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes