Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
बहिणींनो, भाऊरायाच्या रक्षणासाठी बांधा 'या' रंगांची राखीमॅच संपू दे मग बघतो, अंपायर धर्मसेनाने केएल राहुलला दिली धमकी, नेमकं घडलं काय?आशियाई देशांमध्ये सोन्याची मागणी पुन्हा वाढली, एका तोळ्याचा दर किती?सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर व्याख्यानकोल्हापूर मध्ये सर्किट बेंच-न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावानिर्लेखित साहित्य खरेदीसाठी दरपत्रके सादर करावीतसार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कारासाठी सहभागी होण्याचे आवाहनमहसूल विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 35 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान

जाहिरात

 

मंदिरात पूजा करणाऱ्या महिलेची फसवणूक! दागिन्यांऐवजी बिस्किटांचे पुडे

schedule09 Dec 24 person by visibility 119 categoryPolice Diary

कोल्हापूर : ज्योतिषी असल्याचा बहाणा करून एका महिलेची फसवणूक करत, सोन्याचे चेन आणि अंगठी असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज अनोळखी व्यक्तीने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी नेहरू चौकातील मारुती मंदिरात घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.नेहरू चौकातील गुरव कुटुंबीय हे मारुती मंदिराचे पुजारी आहेत. पूजा करण्यासाठी मंदिरात आलेल्या विजया चंद्रकांत गुरव यांना सकाळी सातच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने स्वतःला ज्योतिष असल्याचे सांगितले. त्याने दक्षिणा ठेवण्यासाठी जागा विचारली आणि आपल्या बोलण्याने गुरव यांचा विश्वास संपादन केला.

अनोळखी व्यक्तीने गुरव यांना सांगितले की, त्यांच्या दागिन्यांवर दक्षिणेचे पैसे ठेवल्यास त्यांचे भविष्य चांगले होईल. त्यावर विश्वास ठेवून गुरव यांनी चेन व अंगठी काढून त्याच्या सांगण्यावर दक्षिणेच्या पैशांसोबत गुंडाळून ठेवले. मात्र, यानंतर संबंधिताने हातचलाखी करून दुसरी कॅरिबॅग गुरव यांच्याकडे दिली आणि घरी नेऊन उघडण्याचा सल्ला दिला.

गुरव यांनी घरी जाऊन कॅरिबॅग उघडली असता त्यात दागिन्यांऐवजी बिस्किटांचे पुडे दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुरव मंदिराकडे धावल्या, मात्र तोपर्यंत संबंधित पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळताच गुरव यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत असून, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींच्या अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes