पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदी बेनझीर नदाफ यांची निवड
schedule31 Jul 25 person by visibility 45 categoryPolitics

कोल्हापूर : गेली तीस वर्षे ग्राहक चळवळीमध्ये जागो ग्राहक जागो हा नारा घेवून काम करणाºया राष्ट्रीय संघटन असलेल्या प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन सप्टेंबर महिन्यात होत आहे. त्याचे नियोजन सुरु असून नुकतीच पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या बेनझीर अमीन नदाफ (रा. यादवनगर, कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर राहून सामान्य ग्राहकाला न्याय देण्याचं काम ते या पदावरुन करतील असा विश्वास आहे. गेली ३० वर्षे महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण भारतभर आपल्या संघटनेचे पदाधिकारी असून ते ग्राहक चळवळीमध्ये काम करीत आहेत, अशी माहिती प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विकास बिसुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डाँ. अजित देसाई, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. भारत देवळेकर-सरकार, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा बेनझीर नदाफ, कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष अभिषेक खोत आदी उपस्थित होते.
वंचित आणि गोरगरीब जनतेसाठी माणूस हाच खरा परमेश्वर असतो. तोच माणसातला देव असतो. आजकाल गोरगरीब जनतेच्या रक्ता-मांसाच्या चिखलाच्या जोरावर धनदांडगे झालेल्यांची संख्या अफाट आहे. पण त्यांच्या सुख-दु:खाकडे लक्ष देणाºयांची संख्या खूपच कमी आहे. गोरगरीबांची सुख-दु:खे आपली समजून त्यांच्यासाठी काम करणाºया बेनझीर नदाफ यांनी कोल्हापूर शहरात जवाहरनगर, यादवनगर, विक्रमनगर आदी परिसरात ई-श्रम कार्ड वाटप, आरोग्य शिबीरे, भांडी वाटप, चष्मा वाटप, रुग्णांना जेवण, फळे वाटप, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासकीय योजना त्यांचेपर्यंत पोहचवून त्याचा लाभ देण्याचं काम त्या करीत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यांची दखल घेवून प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी त्यांची निवड केल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बिसुरे यांनी सांगितले.
प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे महाराष्ट्रात सुमारे १०० पेक्षा जास्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे अशासकीय सदस्यांची नोंदणी आहे. तर देशपातळीवर ३०५ पेक्षा जास्त अशासकीय सदस्य आहेत. तसेच सदस्य व पदाधिकारी सुमारे ५ हजार पेक्षा जास्त आहेत. या समितीचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात घेण्यासाठी नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांचेसोबत बैठक झाली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांसह महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सप्टेंबरमध्ये कोल्हापुरात होणाºया अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु केली आहे. ग्राहक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून ग्राहकांना न्याय देण्याबरोबरचं त्यांची कोठे फसवणूक होवू नये, यासाठी समिती सक्रिय राहणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष डॉ. बिसुरे यांनी स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्रात नवीन पदाधिकारी निवड सुरु असून सामाजिक कार्यात आवड असणाºया तसेच जनमाणसात प्रतिमा स्वच्छ असणाºया इच्छुक व्यक्तिंची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वांधिकार राजेश भोसले यांनी दिले असल्याचेही डॉ. विकास बिसुरे यांनी सांगितले.