Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
बहिणींनो, भाऊरायाच्या रक्षणासाठी बांधा 'या' रंगांची राखीमॅच संपू दे मग बघतो, अंपायर धर्मसेनाने केएल राहुलला दिली धमकी, नेमकं घडलं काय?आशियाई देशांमध्ये सोन्याची मागणी पुन्हा वाढली, एका तोळ्याचा दर किती?सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर व्याख्यानकोल्हापूर मध्ये सर्किट बेंच-न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावानिर्लेखित साहित्य खरेदीसाठी दरपत्रके सादर करावीतसार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कारासाठी सहभागी होण्याचे आवाहनमहसूल विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 35 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान

जाहिरात

 

कोल्हापूरचे वैशिष्ट दाखविणारा रॅपसाँग ‘कोल्हापूरी तडका... 

schedule23 May 25 person by visibility 316 categoryकोल्हापूर

सामाजिक विषयावरील रॅपसाँग २५ मे रोजी रिलीज होणार

कोल्हापूर : नाही तटतं, नाही अडत असं आमचं कोल्हापूर..!  ही टँगलाईन घेवून कोल्हापूरच्या वैशिष्ट्यावर असलेल्या ‘कोल्हापूरी तडका’  रॅप साँग चा रिलीज शुभारंभ दिनांक २५ मे रोजी शाहुस्मारक सभागृहात दुपारी दीड वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कृष्णराज महाडिक, दूर्गा फौंडेशनच्या डॉ. शर्वरीताई पवार, ग्राहक सेवा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रंजना मालसुरे-पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. कोल्हापूरचा साँग जगात गाजणार अशी दर्जेदार बांधणी यशराज प्रोडकशनच्या माध्यमातून केली आहे.

कोल्हापूरी तडका रॅपसाँग हा कसबा बावडा येथील एका गरीब घराण्यातील रांगडा बोनलेस रॅपर गायक-डान्सर विशाल खांडेकर लिखीत आहे. कोल्हापूरचे वैशिष्ट्य सांगणारा हा रॅप असून कोल्हापूर शहर आणि परिसरात या रॅप साँगचे शूटींग झाले आहे. ऐतिहासिक, सांस्कृतीक आणि खाद्य क्षेत्रामध्ये आपल्या कोल्हापूरचा जगभर नावलौकीक आहे. कोल्हापूरी ब्रॅण्ड असणाºया सर्वच गोष्टीं या रॅपसाँगमध्ये पाहायला मिळणार आहेत. अंबाबाई मंदीर, दसरा चौक, ताराराणी पुतळा, तावडे हॉटेल, पंचगंगा नदीघाट, गंगावेश तालीम, महाद्वाररोड, सेनापती कापशी, आदमापूर, चिखली, कसबा बावडा भगवा चौक, जोतिबा, पन्हाळा आदी ठिकाणी कोल्हापूरी तडका रॅपसाँगचे शूटींग झाले आहे. कुस्तीपंढरी, कोल्हापूरचा पैलवान, कोल्हापूरी मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरी चप्पल, गुºहाळघरे, ऊसाची शेती, कोल्हापूर पोलीस, कोल्हापूरी मसाला, कोल्हापूरी भेल, गावाकडचा शेतकरी, दूध कट्टा अशी वैशिष्ट्यपूर्ण बांधणी या रॅपसाँगची करण्यात आली आहे.

कोल्हापूरी तडका रॅपसाँगमध्ये काम करण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे, सांगली याठिकाणाहून कलाकारांची मागणी होती. परंतु कोल्हापूरच्या मातीतील कलाकारांना संधी या रॅपसाँगमध्ये देण्यात आली आहे. मुख्य भूमिकेत बोनलेस रॅपर विशाल खांडेकर असून अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे असणारे मदन पलंगे, राजेश्वरी मोटे, डॉ. शर्वरी पवार, सचिन चांदणे, संजय चितारी, सना सय्यद, पल्लवी पोतदार, बालाजी कदम, अब्दुलहमीद मीरशिकारी, शामराव कालमुळे आदी कलाकारांनी यामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. डिरेक्टर आॅफ सिने मोटोग्राफी-डीओपी अजिज मिरजकर, संगीत प्रवीण ऐवळ, कॅमेरा असिस्टेंट युवराज चव्हाण, लाईटमन सुरेश लाड, मेकअप आर्टिस्ट शिवानी शिंदे, तेजस्विनी कुलकर्णी, शामराव कालमुळे या सर्वांच्या बुद्धीकौशल्यातून हा साँग पुढे येत आहे. कोल्हापूरचा मुलगा-कलाकार बोनलेस रॅपर विशाल खांडेकर याला बळ, प्रेरणा, उभारी देण्याचं काम यशराज प्रोडकशनच्या माध्यमातून केलं आहे. पत्रकार परिषदेस निर्माते-दिग्दर्शक एकनाथ पाटील, विशाल खांडेकर, सचिन चांदणे, संजय चितारी, राजेश्वरी मोटे, अजिज मिरजकर, बालाजी कदम आदी उपस्थितीत होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes