Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
धनश्री जोशी यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संकेत सोनवणे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न... पल्लवी गायकवाड यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर जयंत पाटलांचा टोला... 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?भरतशेठचा अजित दादांना मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर चिमटा... पशुसंवर्धन विभागाच्या विविध लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करा - जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर

जाहिरात

 

10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय...?

schedule03 May 25 person by visibility 61 categoryकोल्हापूर

Maharashtra Board Class 10th 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) लवकरच दहावी (SSC) आणि बारावी (HSC) वर्ग 2025 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.यंदा 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असून ते निकालाच्या तारखेची आणि मार्कशीट कधी हातात येईल याची हत आहेत. यावर्षी, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च आणि बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली.निकाल जाहीर झाल्यानंतर, 10वी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर त्यांची प्रोव्हिजनल मार्कशीट तपासू शकतील.

ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्र बोर् हेड मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्ड दहावी (एसएससी) निकाल आणि महाराष्ट्र बोर्ड बारावी (एचएससी) निकाल 2025 जाहीर करू शकते. गेल्या वर्षी एसएससी बोर्डाचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. त्याआधी 2019 साली 08 जूनला तर 2020 मध्ये 29 जुलैला आणि 2023 साली हा निकाल 02 जूनला लागला होता. आता बोर्ड लवकरच निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करणार आहे.दहावीप्रमाणे, महाराष्ट्र बारावी (एचएससी) उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 % गुण मिळवावे लागतात. दोन्ही वर्गांसाठी उत्तीर्ण होण्याचे निकष सारखेच आहेत. प्रत्येक विषय १०० गुणांचा असतो, ज्यामध्ये थिरी 80 गुणांची असतो आणि प्रॅक्टिकल/इंटर्नल मूल्यांकन 20 गुणांचे असते. उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 35 गुण आवश्यक आहेत. म्हणजेच 80 गुणांच्या थिअरी पेपरमध्ये किमान 28 गुण मिळवणे आणि प्रॅक्टिकलमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक तपासावे. मूळ गुणपत्रिका काही दिवसांनी शाळेतून उपलब्ध होईल. जर तुम्ही निकालांमुळे माधानी नसाल, तर तुम्ही जून 2025 मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, ते जुलै 2025 मध्ये पुरवणी परीक्षेला बसू शकतात. विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर विश्वास ठेवावा आणि बनावट बातम्यांपासून दूर रहावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes