संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर शॉपीचे उद्घाटन संपन्न...
schedule05 May 25 person by visibility 12 categoryकोल्हापूर

सातवे - गावातील संतोष कुंभार व अर्चना कुंभार यांनी सुरु केलेल्या संत गोरोबा काका किंवा आयुर्वेद हेल्थ केअर, कॉस्मेटिक आणि पर्सनल केअर शॉपीचे उद्घाटन माजी सरपंच अमर दाभाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर फीत कापण्याचा मान बाँझ चेअरमन बापूसो कुचेकर यांना मिळाला.
या प्रसंगी संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन भरत मोळे यांनी केले. यावेळी कंपनीच्या उत्पादने आणि आरोग्यविषयक माहितीचे मार्गदर्शन बापूसो कुचेकर यांनी केले. तर प्रात्यक्षिक सादरीकरण भरत मोळे यांनी करून दाखवले.
नवीन व्यवसायासाठी संतोष कुंभार यांना अमर दाभाडे व बाळासो नंदूरकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक चौगुले यांनी केले.सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमर दाभाडे, बाळासो नंदूरकर, बापूसो कुचेकर, गोरक्षनाथ कालेकर, भरत मोळे, गौरी कालेकर, रत्नमाला कुचेकर, भक्ती मोळे, शहाजी कदम, अरुण इटकरकर, बसापा कोरे यांच्यासह ग्रामस्थ, उपस्थित होते.