रेखा काटे यांची समर्थ अवॉर्ड साठी निवड...
schedule05 May 25 person by visibility 46 categoryकोल्हापूर

२५ मे रोजी कोल्हापूरात दिमाखदार कार्यक्रम
कोल्हापूर : दिव्या कांबळे
वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत जिद्द, चिकाटी, व धाडस करत स्वतःच अस्तित्व निर्माण करत यशाच्या शिखरावर पोहचणाऱ्या रेखा काटे यांची समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. रविवार २५ मे रोजी कोल्हापुरातील शाहु स्मारक सभागृहात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने रेखा काटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रेखा काटे या शाहू वसाहत समाधान निवास बालिंगा कोल्हापूरच्या रहिवाशी असून त्यांचे शिक्षण नर्सिंग डिप्लोमा जी. एन. एम पर्यंत झाले आहे. आता सध्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे इन्चार्ज सिस्टर या पदावर अपघात विभागामध्ये कार्यरत आहेत. 1996 ला खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आणि घर आणि वैद्यकीय क्षेत्र अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली. हे सगळं एन्जॉय करत त्यांनी घर आणि वैद्यकीय क्षेत्र दोन्ही सांभाळलं. कोरोनाच्या काळात एक कोरोना योध्या म्हणून त्या लढल्या आणि आपली सेवा बजावली आणि सगळ्याची पोचपावती म्हणून ''कोरोना योद्धा'' आणि ''कोरोनाची रणरागिनी'' हा पुरस्कार त्यांना मिळाला. खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक पर्वात सक्रिय शिलेदार असल्याचा अभिमान कोरोना संपल्यावर त्यांना या पुरस्कारामुळे झाला.
रेखा काटे या वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा अहोरात बजावत असतात तसेच कुटुंबाचा देखील तितक्याच आपुलकीने सांभाळ करतात. आज त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केल आहे, आणि वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळाले आहे. लोकांशी चांगले नातेसंबध निर्माण झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेवून अनेक सामाजिक संस्था, मीडियाकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक, उद्योग क्षेत्रातील यशस्वी भरारीची दखल घेत त्यांची समर्थ फौंडेशन आणि दूर्गा फौंडेशन-जागर न्यूज यांच्या वतीने समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.